सुंदर सुंदर शाळा
दिव्य ज्ञानाचे
मंदिर
भविष्य उद्याचे
घडविते
समृद्ध सोज्वळ सुधीर
ज्ञानयज्ञ अखंड
चाले
चालते नैतिकतेचे
सिंचन
मानवतेचे सर्व मुलांवर
मूल्य बिजांचे रोपण
धडे शिकूनी जगण्याचे
होती जगण्यासाठी
तत्पर
जीवनयुद्धात सामर्थ्याने
पुढे-पुढे अग्रेसर
गुरुजी आणि ग्रंथांचा
सर्व मुलांना आधार
अक्षरातील मूल्य
प्राशुनी
होती जीवने साकार
नाव करिती आईबाबांचे
आणि सुंदर शाळेचे
राष्ट्राला उंच
उंच नेती
वेध घेउनी शिखराचे
- अमोल पाटील
(पूर्वप्रसिद्धी : कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखा द्वारा प्रकाशित ‘मायमराठी’ विशेषांक
२०१५)