झाली मेघ गर्जना
आता पाऊस येणार
माझा शेतकरी राजा
आता कंबर कसणार
उन्हावार्यात कष्टानं
सारं नांगरलं शेत
नांगरुन झाल्यावर
चाले पेरायचा बेत
दोन बैलाच्या जोडीनं
तयार झालय तिफन
आता सुरुवात झाली
करण्या बिजांच रोपन
कष्टा त्याच्या
या पाहून
बरसला मेघराजा
बिजाचं अंकुर पाहून
सुखावला बळीराजा
उभं आयुष्य जगला
माझा शेतकरी राजा
साय मायेची चाखला
अवघ्या जगाचा पोशिंदा
जग बांडगुळ झालं
खांद्यावर हो दादाच्या
आज विसर पडियेला
माझ्या दादाच्या
कष्टाचा
अमोल पाटील
(पूर्वप्रसिद्धी : कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखा द्वारा प्रकाशित ‘मायमराठी’ विशेषांक
२०१३)