▶️ About us


अमोल गुणवंतराव पाटील
Blog - amolpatilwrites.blogspot.com
Email - amolpatilwrites@gmail.com

संक्षिप्त परिचय
मुळ गाव - जानापूर, ता. उदगीर, जि. लातूर
सध्या वास्तव्य - विरार पश्चिम, ता. वसई, जि. पालघर

प्र.मुख्याध्यापक
लेखक कवी

प्रकाशित साहित्य
* सप्टेंबर २०१४ मध्ये 'इंद्रधनुष्य' हा पहिला काव्यसंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृृृृती मंडळ द्वारा प्रकाशित.
* एप्रील २०१८ मध्ये 'मुक्तश्वास' या दुसर्‍या काव्यसंग्रहाचे प्रकाशन.
* 'मायमराठी' (कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखा द्वारा प्रकाशित विशेषांक), 'गीत' (नाताळ अंक), 'शिक्षकांच्या कविता' (शिक्षक साहित्य संमेलन संस्था द्वारा प्रकाशित काव्यसंग्रह.) 'सागरलाटा' (दिवाळी अंक) इ. मधून लेख व कविता प्रसिद्ध...
* दैनिक 'आपलं महानगर' या वर्तमानपत्रामधून नियमितपणे वैचारिक लेखन प्रसिद्ध...

पुरस्कार
* संस्कृृृती संवर्धन प्रतिष्ठान, मुंबई द्वारा विशेष शिक्षक पुरस्कार - २०१४
* काव्य मित्र संस्था, पुणे द्वारा 'राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार'- २०१९
* डाॅ. आंबेडकर भवन ट्रस्ट वरळी मुंबई द्वारा आदर्श शिक्षक पुरस्कार - २०२२

Social Links

समारंभाची क्षणचित्रे...वर्तमानपत्रांनी घेतलेली दखल







बृहन्मुंबई मनपा शिक्षण विभागातील आमच्या डी एन नगर एमपीएस माध्यमिक शाळा अंधेरी पश्चिम येथील कु. आसीया सयद ही विद्यार्थीनी ९६.२% गुण घेऊन संपुर्ण बृहन्मुंबई मनपाच्या शाळांमधून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली... त्यानिमित्त मनपा शिक्षण समीती अध्यक्षा मा. राजश्री शिरवाडकर मॅडम मनपा आयुक्त मा. आश्विनी भिडे मॅडम उपायुक्त मा. प्राची जांभेकर मॅडम शिक्षणाधिकारी माध्यमिक मा. सुजाता खरे मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक मा. किर्तीवर्धन किरतकुडवे सर उपशिक्षणाधिकारी माध्यमिक मा. आरती खैर मॅडम यांनी या विद्यार्थीनीचा ११|५|२६ रोजी बृ मनपा मुख्यालय येथे सत्कार केला यावेळी शाळेचे प्र. मुख्याध्यापक म्हणून उपस्थित राहता आले... शाळेच्या या उज्ज्वल निकालामागे शाळेतील अभ्यासू व मेहनती शिक्षक वर्ग, विद्यार्थी व पालकांचा उत्स्फुर्त सहभाग हे घटक कारणीभुत आहेत... या सर्वांचे अभिनंदन!
---
दैनिक सकाळ दि. २७|४|२६
----

दैनिक पुढारी दि. २५|४|२६
---

दैनिक नवराष्ट्र दि. २३|४|२६
---






सकल लिंगायत समाज बांधव पालघर जिल्ह्याच्या वतीने वंजारी समाज हाॅल नवापुर रोड बोईसर येथे मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित समारंभात माझ्या वैचारिक लेखन कार्याची दखल घेत मला सन्मानित करण्यात आले. माझे अनेक वैचारिक लेख विविध वर्तमानपत्रांमधून नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्याचीच दखल घेत सकल लिंगायत समाज बांधव पालघर जिल्हा द्वारा या लेखन प्रवासाचा गौरव यावेळी करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या गेल्या. या शुभेच्छा आणि हे शुभाशिर्वाद येथुन पुढील लेखन प्रवासासाठी मला निश्चितच प्रेरणादायी असणार आहेत. यावेळी मंचावर पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष चौधरी सर व्याख्याते प्रा. राजा माळगी सर व्याख्याते धर्मराज पाटील सर प्रा. सोमनाथ विभुते सर व अन्य मान्यवर उपस्थित होते. आयोजक मंडळी प्रती व सर्वांप्रती थोर कृतज्ञता...🙏
---

CTET RESULT... संपुर्ण देशभरातील शिक्षण क्षेत्रात सध्या बहुचर्चित असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला... यातील दोन्ही पेपरमध्ये पात्र!...
---




साहित्य व सांस्कृतिक जीवनात गेली अनेक वर्षे ज्यांचा सातत्याने सहवास लाभत आला आहे... ज्यांच्या सानिध्यात निरंतर नित्यनुतन असे खुप काही शिकायला मिळत असते... असे माझे मार्गदर्शक मा. महापौर वसई विरार शहर मनपा अजीवजी पाटील...यांची आज ९ मार्च रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेऊन मराठवाडा सांस्कृतिक मंडळ... शिक्षण संवाद मंच व यशवंत ॲवेन्यु सोसायटीच्या वतीने प्रमुख पदाधिकार्‍यांसह वाढदिवस अभिष्टचिंतनपर भेट घेऊन त्यांच्या पुढील दैदिप्यमान वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या...
---


शिवजयंती २०२६ यशवंत ॲवेन्यु सोसायटी
---




भाषा व साहित्यप्रेमी व्यक्तीमत्व सन्मा. श्री. अजीव पाटील हे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर पदी विराजमान झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! आणि पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा!... सन २०१४ पासून कोकण मराठी साहित्य परीषद विरार शाखेच्या कार्यकारणीवर आम्ही एकत्र काम करताना...तदनंतर यंग स्टार्स ट्रस्ट अंतर्गत 'शिक्षण संवाद मंच' या शैक्षणिक उपक्रमातंर्गत त्यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करताना...सागरलाटा या दिवाळी अंकाकरीता मी लेख लिहिताना याच दिवाळी अंकाचे संपादक असलेले अजीव पाटील यांच्याशी मनसोक्त चर्चा करताना व मराठवाडा सांस्कृतिक मंडळ पालघर जिल्हा आयोजित पहिल्या वहिल्या स्नेहमेळाव्याच्या आयोजनात आम्हांस ते मोलाचे सहकार्य करताना... अशा कितीतरी सामाजिक सांस्कृतिक व्यासपीठांवरील त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगता येतील... साहित्य व संस्कृतीशी घट्ट नाळ जोडून असलेले भाषा व साहित्यप्रेमी अजीव पाटील यांच्यातील अष्ठावधानी व्यक्तीमत्वाची वेळोवेळी पदोपदी जाणीव होत असते...त्यांच्या अगामी पुढील यशस्वी व भव्यदिव्य घोडदौडीला मनःपुर्वक सदिच्छा!
- अमोल पाटील सर
---



















वार्षिक सांस्कृतिक समारंभ २०२६ यशवंत ॲवेन्यु सोसायटी
---


वार्षिक क्रिडा स्पर्धा १० जानेवारी २०२६
----







क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव ३ जाने २०२६...
----



प्रशासकीय अधिकारी शाळा के पश्चिम यांची शाळा भेट दि. २ जानेवारी २०२६
--- 


ग्रंथालीचा ५१ वाचक दिन कोमसाप विरार शाखेच्या संयुक्त विद्यमाने विवा काॅलेज येथे आयोजित समारंभात शाखेतर्फे उपस्थितांचे आभार व्यक्त करताना दि. ११ डिसेंबर २०२५
---



आयुष्यात लढवलेली एकमेव निवडणूक... ते ही आमच्या यशवंत ॲवेन्यु सीएचएस लि. या सोसायटीतील सर्व माता भगीनी बंधूच्या विशेष आग्रहास्त लढवली... आणि त्यात मिळालेले हे मताधिक्य...एक अविस्मरणीय अनुभव... वसई विरार मनपाचे माजी स्थायी समिती सभापती व सागरलाटाचे संपादक मा. श्री. अजीवजी पाटिल साहेब मा. युवा नगरसेवक हार्दिकदादा राऊत साहेब मा. विनय राऊत आप्पा साहेब व अर्चित पाटील साहेब यांचे मार्गदर्शन व सहकार्याने सोसायटीतील रहावाशांची मनोभावे केलेल्या सेवेची ही फलनिष्पत्ती असे मला नेहमी वाटते...
---

बृहन्मुंबई मनपा माध्यमिक शिक्षक संघर्ष संघटना...
---



दैनिक लोकसत्ता दि. १७|९|२५
---
दैनिक सकाळ दि. १६|९|२०२५
---

दैनिक महासागर दि. १६|९|२०२५
---















*मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न*
विरार : मराठवाडा सांस्कृतिक मंडळ द्वारा आयोजित स्नेहमेळावा विरार पश्चिमेच्या न्यु विवा काॅलेज मधील सेमीनार हाॅल येथे रविवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मोठ्या दिमाखात व उत्साहात पार पडला. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेतृत्व करणारे थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समारंभाला सुरूवात झाली. रविंद्र मळवटकर यांनी मराठवाड्याचे गुणगाण आपल्या स्वागतगीतातून मांडले तर लेखक कवी अमोल पाटील सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून या कार्यक्रमाचा उद्देश्य व भविष्यकालीन वाटचाल यावर सविस्तर भाष्य केले. मंडळाच्या कार्याला नेहमीच सहकार्य करणारे सागरलाटा या दिवाळी अंकाचे संपादक अजीव पाटील व उपसंपादक हार्दिक राऊत यांचा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाद्वारे यावेळी कृतज्ञतापर सत्कार कवी लेखक अमोल पाटील यांनी शब्दबद्ध केलेला अभिष्टचिंतनपर मजकुर स्मरणपत्र रूपाने भेट देऊन करण्यात आला. मुळचे मराठवाड्यातील रहीवाशी असणारे व सध्या वसई विरार पालघर जिल्ह्यात स्थायिक असणारे डाॅक्टर वकील शिक्षक प्राध्यापक पत्रकार व्यवसायिक शासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मराठवाड्यातील साहित्य संस्कृती जोपासणार्‍या वृद्धींगत करणार्‍या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या अशा विधायक उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आपल्या कृतज्ञापर सत्कारानंतर मांडलेल्या शुभेच्छापर मनोगतातून अजीव पाटील व हार्दिक राऊत यांनी मांडले. डाॅ. बळीराम पारसेवार पत्रकार विजय गायकवाड डाॅ. श्याम कुलकर्णी डाॅ. महादेव तोंडारे शिक्षक लहुकुमार शिंदे अमोल वाघमारे भरत वटाणे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवीकीरण सोनवणे व निसार तांबोळी यांनी केले तर आभार अमरदिप अचेमवार यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ कोअर टीममध्ये असलेले कवी लेखक अमोल पाटील सर डाॅ. श्याम कुलकर्णी विनायक चोले भरत वटाणे राजपाल रेड्डी रवी पफाळ प्रा गोपीनाथ नागरगोजे शरद कांबळे अमरदिप अचेमवार लहुकुमार शिंदे अमोल वाघमारे ज्ञानोबा शिंदे शितल कुलकर्णी शिल्पा घुगे राजु मुंडे रवी सोनवणे निसार तांबोळी नरेश देबडवार रविंद्र मळवटकर यांनी परीश्रम घेतले.
---




शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी दहीसर पुर्व सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेला परीक्षक म्हणून उपस्थित...
———




शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० - १७ ते २२ फेब्रु. २०२५ आर के मार्ग मनपा शाळा अंधेरी पुर्व
———
शिवजयंती उत्सव २०२५ विरार येथे मा. युवा नगरसेवक हार्दिकदादा राऊत यांच्या समवेत...
———










शिवजयंती उत्सव २०२५ यशवंत ॲवेन्यु सोसायटी... मनोगत व्यक्त करताना...
---




वार्षिक शाळा तपासणी भेट व विद्यार्थी मार्गदर्शन उपक्रम...६ फेब्रु. २०२५ गणेश नगर एमपीएस माध्यमिक शाळा कांदिवली पश्चिम
———

वार्षिक शाळा तपासणी भेट व विद्यार्थी मार्गदर्शन उपक्रम...९ फेब्रु. २०२५ जुहू गांधीग्राम एमपीएस माध्यमिक शाळा विलेपार्ले पश्चिम
———














यशवंत ॲवेन्यु सीएचएस या माझ्या सोसायटीतील वार्षिक सांस्कृतिक समारंभ दि. १८|१|२५ रोजी मा.स्थायी समिती सभापती अजीवजी पाटील साहेब मा. स्थानिक नगरसेवक रंजनजी पाटील साहेब मा. युवा नगरसेवक हार्दिकदादा राऊत साहेब सन्मा. सिद्धार्थ ठाकूर साहेब व शेजारील सोसायटीचे पदाधिकारी मान्यवर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.. या समारंभाच्या यशस्वी संयोजनाबद्दल मला सोसायटीकडून तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले...
---
दै. सकाळ ५|८|२४

दै. प्रहार ५|८|२४

दै. पुढारी ६|८|२४

दै. आपलं महानगर ६|८|२४

दै. लोकमत ६|८|२४
---
दैनिक लोकमत दि. १९|६|२४


दैनिक सकाळ दि. २१|६|२४...


दैनिक 'आपलं महानगर' दि. १८|६|२४...

दैनिक पुढारी दि. १८|६|२४...








पालघर (ठाणे) जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळाच्या साहित्य समितीद्वारा आयोजित 'साहित्यिकांचा सन्मान सोहळा व कवी संमेलन' बोईसर...


दैनिक पुढारी दि. १३|६|२४

दैनिक आपलं महानगर दि. १२|६|२४

दैनिक सकाळ दि. १२|६|२४




मुंबईतील उदगीरकर आयोजित स्नेहसंमेलनात मनोगत व्यक्त करताना.. सहयोग मंदिर ठाणे २६ में २०२४
---


भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारंभ १४ एप्रील २०२४...यशवंत ॲवेन्यु सोसायटी... मनोगत व्यक्त करताना...
---

शिवजयंती समारंभ १९ फेब्रुवारी २०२४...यशवंत ॲवेन्यु सोसायटी...
---












रविवार दि. १४ जानेवारी २०२४ रोजी मी वास्तव्यास असलेल्या यशवंत ॲवेन्यु रहीवाशी परीवारातील सदस्यांतर्फे माझ्या लेखनविषयाची दखल घेत प्रोत्साहन देण्यासाठी सन्मान सोहळा आयोजित केला तत्प्रसंगी व्यक्त केलेले मनोगत...
आपल्या सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद!
मान सन्मान सत्कार आणि हार शाल पुष्पगुच्छ या गोष्टींपासून खरं म्हणजे मी जाणीवपुर्वक दुर राहण्याचा प्रयत्न करत आलो आहे.. तरी आज आवर्जुन माझ्या लेखनावर प्रेम करणार्‍यांनी पाठवलेल्या शुभेच्छांचा केलेल्या सन्मानाचा मी माझ्या इथून पुढील वाटचालीस माझ्याकरीता एक दिपस्तंभ म्हणून स्विकार करतो..आपण घेतलेले अनुभव ऐकलेल्या पाहीलेल्या गोष्टी घटना प्रसंग व अनुभवलेल्या व्यक्ती आणि यातून तयार होत गेलेली शिदोरी व त्याच्या माध्यमातून तळागळातल्या अगदी सामान्यांचा आवाज लेखनीच्या माध्यमातून सर्वदुर पसरवणे हे मी स्विकारलेले वृत्त आहे व त्यात रमने मनन चिंतन करणे अधिकाधिक वाचन करणे संवाद साधणे यात रमनारा मी एक सामान्य माणूस आहे.. साहित्य क्षेत्र व त्यात फार मोठमोठी माणसे आपल्या अवतीभोवती आहेत..त्यांचा मला कायम सहवास लाभला व मार्गदर्शन मिळाले.. व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणचे या क्षेत्रात जे फुल ना फुलाची पाकळी असं छोटसं मी कार्य करू शकत आहे याचे श्रेय माझे कुटुंबीय उत्तम मित्रवर्ग व वाचक वर्ग यांचा आहे.. आजपर्यंत माझ्या लेखनावर मनापासून प्रेम करणारे व सविस्तर प्रतिक्रीया नोंदवणारे वाचक मला लाभले..हे माझे बळ आहे...हे अतिशय सुंदर समृद्ध व्यासपीठ मला आपलं महानगरचे पालघर निवासी संपादक श्री शशी करपे सर व सारांश पुरवणी संपादक श्री हेमंत भोसले सर यांनी उपलब्ध करून दिले त्याबद्यल त्यांचे मनःपुर्वक आभार...🙏🙏
---




शनिवार दि. २३ डिसेंबर रोजी मयुरेश प्रकाशन विरार आयोजित 'वाचक मेळावा' समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत मराठी भाषा वाचक चळवळ या विषयावर मनोगत व्यक्त केले...
---


दैनिक सकाळ दि. ४|१०|२३
दैनिक लोकसत्ता दि. ३|१०|२३
——

दि. ३० सप्टेंबर २०२३
यंग स्टार्स ट्रस्ट विरार अध्यक्ष : लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आयोजित 'साहित्य चावडी' या साहित्य क्षेत्रात सातत्याने गेली अनेक वर्षे उपक्रम राबवत असलेल्या प्रसिद्ध व्यासपीठाच्या ५२ व्या पुष्पात कवी ना धों महानोर विशेष कार्यक्रमात चावडी सरपंच म्हणून मला निमंत्रीत करण्यात आले होते आपल्या अत्यंत आवडत्या कवीबद्दल आणि त्यांच्या कवितांबद्यल बोलण्यासाठी मला मिळालेली ही फार मोठी संधी होती. या कार्यक्रमात मी व्यक्त केलेले मनोगत आणि कविता वाचन...
———





दि. ३१|८|२३ आमच्या डी एन नगर एमपीएस माध्यमिक शाळेचा एसएससी बोर्ड परीक्षा मार्च २३ मध्ये १००% निकाल लागल्याबद्दल योगी सभागृह दादर येथे महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री मा.श्री. दिपक केसरकर आणि मुंबई मनपा शिक्षण विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वतीने शाळेचा प्र मुख्याद्यापक म्हणून सन्मान स्विकारताना
———


कोमसाप केंद्रीय वर्धापन दिन.. कोमसाप विरार शाखेद्वारा उत्साहात साजरा.. शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री उमाकांत वाघ विठ्ठलनाथ मंदिर संस्थान विरारचे अध्यक्ष श्री प्रशांत सामंत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव श्री कांबळे सर निवृत्त शिक्षक श्री चौधरी सर केजी हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका श्रीम. चोरघे मॅडम यांच्यासमवेत दिपप्रज्वलन केलं आणि कार्यक्रमाची सुरूवात झाली सर्व मान्यवरांनी आपली मनोगतं व्यक्त केली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौरी संख्ये यांनी केले.. कोमसाप विरार शाखा विठ्ठलनाथ संस्थान व गीता ग्रंथालय विरार या संस्थांचा सहभाग होता
______






यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या तेराव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत सहभाग घेतला.. नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी या विषयावर आयोजित या परिषदेत तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन लाभले.. आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिकांशी साधलेला मनमोकळा संवाद आणि शैक्षणिक विकासासाठी शिक्षकांना केलेले आवाहन मनाला विशेष भावले..
———



मा. सहआयुक्त शिक्षण केशव उबाळे साहेब मा. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ साहेब मा. शिक्षणाधिकारी राजू तडवी साहेब मा. उपशिक्षणाधिकारी ममता राव मॅडम मा. उपशिक्षणाधिकारी किर्तीवर्धन किरतकुडवे साहेब मा. उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे मॅडम मा. अधिक्षक मुख्तार शहा साहेब मा. अधिक्षक निसार खान साहेब मा. प्रशासकीय अधिकारी विजय जाधव साहेब मा. प्रशासकीय अधिकारी किसन पावडे साहेब यांच्या उपस्थितीत २०२१-२२ एसएससी बोर्ड परीक्षेत १००% निकालाबद्दल आयोजित सन्मान सोहळ्यात डी एन नगर एमपीएस शाळेचा सन्मान करण्यात आला..शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून सन्मान स्विकारताना..
___

लोकनेते आमदार मा.श्री. हितेंद्र ठाकूर साहेब (आप्पा) यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेऊन शुभेच्छा दिल्या..
___



आज बृहन्मुंबई मनपाचे आदरणीय प्रशासकीय अधिकारी ह.भ.प किसन पावडे पाटील साहेबांची भेट घेतली.. आदरणीय साहेबांसोबत विविध विषयांवर चर्चा करता आली आणि मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी त्यांना माझा मुक्तश्वास हा काव्यसंग्रह भेट दिला..आदरणीय साहेबांनी माझ्या या लेखन कार्याची दखल घेत माझा सत्कार करत कौतूक केले.. सोबत आदरणीय अशोक हांडे सर उपस्थित होते..🙏
___

दैनिक नरवीर चिमाजी दि. २९|९|२२

दैनिक सागर दि. २६|९|२२

दैनिक आपलं महानगर दि. २६|९|२२





आज दि. २४|९|२२ रोजी डाॅ. आंबेडकर भवन ट्रस्ट तर्फे दिला जाणारा 'आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२-२३' आज मा. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ सर मा. शिक्षणाधिकारी राजू तडवी सर दुरदर्शन सह्याद्री वाहीनीचे निर्माते डाॅ. अलोक खोब्रागडे सर ट्रस्टचे अध्यक्ष मा. सतीश चव्हाण सर सचिव मा. सतीश खरात सर यांच्या हस्ते डाॅ. आंबेडकर मैदान, वरळी मुंबई येथे आयोजित समारंभात मला प्रदान केला त्याबद्दल मनःपुर्वक आभार..
———


दैनिक आपलं महानगर दि. २४|९|२२

दैनिक पुढारी दि. २३|९|२२

दैनिक लोकसत्ता दि. २३|९|२२

दैनिक सागर दि. २१|९|२२



दैनिक नरवीर चिमाजी दि. २१|९|२२


दैनिक सकाळ दि. २१|९|२२
———















यंग स्टार्स ट्रस्ट, विरार आयोजित 'शिक्षण संवाद मंच' अंतर्गत '१ली वार्षिक शिक्षण परिषद' "आंनंददायी शिक्षण" बीजभाषण : प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड प्रमुख उपस्थिती : युवा आमदार मा श्री क्षितीजदादा ठाकूर मा युवा नगरसेवक हार्दिकदादा राऊत मा श्री संजीवदादा पाटील माश्री संजय पिंगुळकर प्रा प्राजक्ता परांजपे डाॅ दिपा वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते या परिषदेला वसई विरारसह  पालघर जिल्ह्यातील शिक्षकव शिक्षणप्रेमी जण उपस्थित होते. शिक्षण संवाद मंचाचे निमंत्रक मा श्री अजीव पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाने शिक्षण संंवाद मंचाची स्थापना झाली या शिक्षण संवाद मंचाचा संयोजक म्हणून या पहिल्या वार्षिक शिक्षण परिषदेत प्रास्ताविकरूपी मनोगत मांडले
———







माझ्या प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाची दखल घेऊन बृहन्मुंबई मनपा शिक्षण विभागाकडून शिक्षक दिनानिमित्त आयोजित समारंभात बृहन्मुंबई मनपा शिक्षण विभागातील प्रमुख सन्माननीय अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला..
———


दि. २८|८|२०२२ रोजी कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखा आयोजित वर्षा कवी संमेलनात 'तेंव्हा भाकर एक होती' ही कविता सादर करताना
___





दि 15/8/22 रोजी आमच्या लक्ष्मी नगर एमपीएस शाळेचे ध्वजारोहण समारंभ विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत माझ्या हस्ते पार पडले..
____



दि. २७|७|२२
बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग | कृतज्ञता आणि स्वागत समारंभ..
बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागाचे विभाग निरीक्षक मा. रोकडे सर यांच्याबद्यल कृतज्ञता आणि नुतन विभाग निरीक्षिका मा. वारके मॅडम यांचे स्वागत..या समारंभात मनोगत व्यक्त करताना
______





'कृतज्ञता दिन महोसव २०२२'
जीवनविद्या मिशन विरार शाखा आयोजित, गुरूपौर्णिमा महोत्सव २०२२ या समारंभाचे दिपप्रज्वलन करण्याची संधी विरार शाखेने मला दिली व प्रवचनकार सौ सुरेखाताई नर यांच्या हस्ते सदगुरू ग्रंथ देऊन माझा सन्मान करण्यात आला हे माझे थोर सौभाग्य..🙏🙏
_____

आज दि. १०|७|२२ रोजी मा युवा आमदार क्षितीजदादा ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक मित्रांसोबत त्यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना

आदरणीय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर साहेब आणि सन्माननीय आमदार राजेश पाटील साहेब यांच्यासमवेत

सन्माननीय मा. युवा नगरसेवक हार्दिकदादा राऊत यांच्या समवेत
_____






दि.१८|६|२२ शनिवार रोजी यशंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आयोजित 'संतांचे मानसशास्त्र' या विषयावर डाॅ. आनंद नाडकर्णी यांचे अतीशय सुंदर आणि सखोल असे व्याख्यान ऐकण्याची संधी प्राप्त झाली या वेळी विशेष उपस्थित संसदरत्न खासदार मा.सुप्रियाताई सुळे मा. डाॅ. आनंद नाडकर्णी सर आदरणीय ताईंचे स्वीय सहाय्यक मा. सुरेश पाटील सर मा. माधव सुर्यवंशी सर मा.वेलणकर सर प्रतिष्ठानचे मा. दत्ताभाऊ यांची भेट झाली.. यावेळी माझे मित्र प्रा डाॅ. रोहित गायकवाड सोबत होते
__________



कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखा आयोजित जागतिक मराठी राजभाषा गौरव दिन समारंभात सहभाग दि. २७|२|२०२१
———


अभिजात मराठी साहित्य सेवा संघ द्वारा आयोजित '२१ फेब्रूवारी आंतरराष्ट्रीय मायबोली दिन' दि. २० फेब्रू २०२१ वाडा पालघर येथे कविता सादर करताना
———




दि १५ डिसे २०२१ शिक्षक सहविचार सभा शनि मंदिर वाघोली वसई येथे आदरणिय डाॅमनिका डाबरे यांच्या हस्ते सन्मान स्विकारताना..
_____




आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि संसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांची गुरूवार दि. २५|११|२१ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र मंत्रालयासमोर मुंबई येथे भेट घेतली यावेळी 'मुक्तश्वास' हा माझा दुसरा काव्यसंग्रह भेट दिला..या भेटीत 'लोक माझे सांगाती' हे पुस्तक मला आदरणिय साहेबांच्या स्वाक्षरीसह मिळाले



दि. २२|११|२१..यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आयोजित साहित्य कट्टा , वाय बी चव्हाण सेंटर नरीमन पाॅईंट मंत्रालयासमोर मुंबई येथे कविता वाचन केले
—————



१ ले जानापूर फेस्टीव्हल मध्ये एसीपी परमेश्वर सेलूकर यांच्या हस्ते सन्मान स्विकारताना
—————

दैनिक नवशक्ती दि. ७|९|२१
———————


दैनिक पुढारी दि. ७|९|२१
———————


रवीवार ५ सप्टें रोजी शिक्षक दिनानिमित्त कोकणी मालवणी सामाजिक संस्था, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था व मराठी व्यापारी मंडळ विरार द्वारा आयोजित समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
——

 
 

दि. ८ मार्च २०२० रोजी चिंचवड, पुणे येथे साहित्य क्षेत्रातील ग्रामीण कवी म्हणून राष्ट्रीय कला गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. थोर वीर तानाजी मालूसरे यांचे बारावे वंशज आदरणीय शितलताई मालूसरे, महाराष्ट्र परीक्षा परीषदेचे सहआयूक्त अनिल गुंजाळ साहेब, अस्तीत्व फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डाॅ.राजश्री जायभाये यांच्या हस्ते हा पुरस्कार स्विकारल्यानंतर आदरणीय शितलताई मालूसरे यांच्यामुळे साक्षात छत्रपती शिवरायांकडून मालूसरे घराण्याला मिळालेली कवड्यांची माळ पाहण्याचा दिव्य अनुभव घेता आला
————


दैनिक पुण्यनगरी दि. १७ फेब्रू. २०२०
#पुरस्काराची बातमी
------------------


दैनिक सकाळ दि. १४ फेब्रू. २०२०
# पुरस्काराची बातमी
------------------------------


दैनिक नरवीर चिमाजी दि. १३ फेब्रू. २०२०
# पुरस्काराची बातमी
-------------------------


दैनिक वसई समता दि. १३ फेब्रू. २०२०
# पुरस्काराची बातमी
----------------------------


दैनिक पुढारी दि. १३ फेब्रू. २०२०.
# पुरस्काराची बातमी
----------------------------

 
 
 

९ वे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन (१४ डिसेंबर २०१९), विवा काॅलेज, विरार. उदघाटक ९३ व्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सीस दिब्रिटो, संमेलनाध्यक्षा ख्यातनाम साहित्यिका प्रज्ञा दया पवार, स्वागताध्यक्ष माननीय आमदार क्षितीजदादा ठाकूर, प्रमुख उपस्थिती माननीय आमदार हितेंद्र ठाकूर, माननीय शिक्षक आमदार कपील पाटील, कवयित्री निरजा. या संमेलनाच्या संयोजका जबाबदारी मला यशस्वीपणे पार पाडता आली.
------------


दै. तरूण भारत. रविवार ८ डिसें २०१९
-------------------------


दै. वसई समता शुक्रवार दि.६ डिसें २०१९
-------


दै. नरवीर चिमाजी दि. ५ डिसें २०१९...९ वे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन वृत्त.
--------


दै.पुढारी दि.५ डिसें २०१९
---------


दै.नवशक्ती दि. १९ एप्रिल २०१९ मधील शिक्षक स्नेहमेळावा वसई विरारचे वृत्त.
-------


 दै.पुढारी दि. १९ एप्रिल २०१९ मधील शिक्षक स्नेहमेळावा वसई विरारचे वृत्त..
------



बुधवार दि. १७ एप्रिल २०१९ रोजी सायं सेमिनार हाॅल नविन विवा महाविद्यालय विरार पश्चिम येथे शिक्षक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सन्मा.श्री अजीवजी पाटील यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती तर प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे होते. यासमयी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना.
———


ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक उमाकांत वाघ संपादित 'साहित्य संगम' च्या रौप्यमहोत्सवी अंकामध्ये 'मुक्तश्वास' या काव्यसंग्रहाचे आलेले हे पुस्तक परीक्षण
——————


२९ वा वसई तालुका कला क्रीडा महोत्सव २०१८ अंतर्गत आयोजित कविता वाचन स्पर्धेत परिक्षक म्हणून सहभाग
--------------------


 दि. १३.१२.२०१८ रोजी जि.प.प्रा.शाळा जानापूर येथे बाळगोपाळांशी सुसंवाद साधण्याची संधी मिळाली. त्यावेळी मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारण्याबरोबरच त्यांना कविता ऐकविल्या.
---------------------------


आमच्या साहित्यिक व शैक्षणिक उपक्रमांच्या पाठीशी नेहमी ऊभे असणारे असे युवा नगरसेवक हार्दिकदादा राऊत यांची सदिच्छा भेट घेऊन काव्यसंग्रह भेट देताना
———


कोमसाप विरारचे कार्याध्यक्ष तथा सागरलाटा या दिवाळी अंकाचे संपादक मा.नगरसेवक अजीवजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेऊन काव्यसंग्रह भेट देताना
————


आमच्या साहित्यिक व शैक्षणिक उपक्रमांच्या पाठीशी नेहमी ऊभे असणारे असे युवा आमदार क्षितीजदादा ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन काव्यसंग्रह भेट देताना
—————


शनिवार दि.५ में २०१८ रोजी कोमसाप डहाणू शाखा आयोजित 'डहाणू साहित्य जागर' या कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक आमचे  प्रेरनास्थान आदरणिय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते कोमसापच्या ग्रंथालयास 'मुक्तश्वास' या काव्यसंग्रहाच्या प्रती भेट म्हणून दिल्या तो क्षण
------------

दै.पुण्यनगरी दि.६ में २०१८
------

दै.सकाळ दि. ५ में २०१८
---------

दै. महाराष्ट्र टाईम्स दि. ४ में २०१८
--------------


दि. २९ एप्रिल २०१८ रोजी सेमिनार सभागृह, जुने विवा महाविद्यालय, विरार पश्चिम येथे कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखेच्या ६ व्या वर्धापनदिन समारंभात माझ्या  'मुक्तश्वास' या दुसर्‍या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.
---------


१३ फेब्रु.२०१८ रोजी कोकण मराठी साहित्य परीषद विरार शाखेच्या नुतन कार्यकारिणी निवड प्रक्रियेतून कोमसाप विरार शाखेच्या कार्यवाहपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.त्यानंतर निवडप्रक्रियेच्या निरिक्षिका सौ.सिमा पाटील मॅडम यांनी अभिनंदन केले.
----------


दि. २७ जाने. २०१८ यंग स्टार ट्रस्ट द्वारा साहित्य विरार अंतर्गत उपक्रमामध्ये कविता वाचन
-----------------

 

दि. २० जानेवारी २०१८ रोजी दामोदर हाॅल परळ मुंबई येथे आयोजित ७ वे राज्यव्यापीे शिक्षक साहित्य संमेलन मध्ये निमंत्रितांचे कविसंमेलन यात सहभागी होउन कवितेचे वाचन.
---------

 

दि. १ डिसेंबर २०१७ रोजी सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय कांदिवली मुंबई येथे शिक्षक स्नेहमीलन मेळाव्यामध्ये शिक्षक आमदार मा. कपिल पाटील साहेब यांच्या हस्ते इंद्रधनुष्य या कवितासंग्रहाच्या लेखनाबद्यल सत्कार करन्यात आला.
---------

 

दि. २९.०७.२०१७
कोमसाप विरार आयोजित वर्षा कवी संमेलनात कविता वाचन.
----------


दि. १ एप्रील. २०१७. रोजी प्रा.सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई ग्रंथसंग्रहालय बिल्डिंग दादर (पुर्व) मुंबई. येथे कोमसाप दादर शाखा आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा आयोजित 'साहित्य रंग' काव्य वाचन खुले कवीसंमेलनामध्ये कविता वाचन.
--------

'कोकणचे लक्ष' (मासिक) फेब्रु. २०१७
--------


दि.१५ जाने.२०१७, अजिंक्य क्रिडा मंडळ मेघवाडी, जोगेश्वरी पुर्व मुंबई. द्वारा आयोजित शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी गुणगौरव समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांशी व परीसरातील रहिवाशांसी सुसंवाद साधताना
-------


ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कादंबरीकार भालचंद्र नेमाडे सर यांना 'राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन- २०१५' दादर ,मुंबई . येथे 'इंद्रधनुष्य' हा काव्यसंग्रह सानंदपुर्वक भेट दिला तो संस्मरणिय क्षण..
--------

 
वाचन प्रेरना दिनाच्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शंकरवाडी मनपा माध्यमिक शाळा जोगेश्वरी (पुर्व) येथे कविता वाचन व विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना
--------


कोकण मराठी साहित्य परीषद विरार शाखा आयोजित वर्षा कवी संमेलनात आदरणिय कविवर्य नंदन पाटील सर यांच्या हस्ते सत्कार.
---------

 

शिक्षक निसार चाॅंदसाब ताबोळी सर यांनी 'इंद्रधनुष्य' या काव्यसंग्रहाबद्यल लिहिलेले अभिप्राय पत्र.
-------


संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मुंबई द्वारा नैतिक शिक्षण योजना अंतर्गत आयोजित शिक्षक कार्यशाळेमध्ये मनोगत व्यक्त करताना
दिनांक-२५ ऑग २॰१५ स्थळ- रुईया हाॅल, मालाड(प) मुंबई
---------

 

दि.२३ आॅगस्ट २०१५ कोमसाप पालघर पहिले जिल्हास्तरिय साहित्य संमेलन डहानू येथे कविता वाचन करताना
--------


दैनिक पुण्यनगरी दि. ५ एप्रिल २०१५ 'इंद्रधनुष्य' काव्यसंग्रह प्रकाशनाची बातमी
------


मराठा सांस्कृतिक मंडळ
गोरेगाव, मुंबई द्वारा पंढरीनाथ सावंत संपादक, मार्मिक यांच्या हस्ते सत्कार ...दिनांक ११ जाने २०१५
-------


मुख्याध्यापक श्री. गायकवाड सर यांच्या हस्ते सत्कार वार्षिक शिक्षक गुणगौरव व स्ने
हसंमेलन - २०१४, स्थळ - मोतीलालनगर म न पा माध्यमिक शाळा गोरेगाव मुंबई.



आदरणीय प्रल्हाददादा पै यांच्या शुभहस्ते इंद्रधनुष्य या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिनांक ५ सप्टे २०१४ जीवनविद्या मुख्यालय बोरिवली 
-----------


संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मुंबई द्वारा विशेष शिक्षक पुरस्कार २०१४ स्थळ :प्रबोधनकार ठाकरे सभागृह बोरिवली, मुंबई
-------------

No comments:

Post a Comment