सूर्य उगवतो जसा
नित्य नित्यची नेमाने
बळीराजा गा शेतात
तसा राबतो निष्ठेने
सूर्य प्रकाशितो
धरा
संपतो अंधार सारा
युगे युगे तळपतो
असा सूर्याचा दरारा
येथे माझा बळीराजा
खूप कष्टतो, राबतो
त्याच्या कष्टाची
रे फळे
सारं जगच चाखतो
सगळ्यांच्या आयुष्यात
यांनी प्रकाश आणला
थोर थोर नमस्कार
बळीराजा व सूर्याला
निर्मळ, निस्वार्थ
सेवा
सार्या जीवांना तारक
सूर्य आणि बळीराजा
जीवितांचे उद्धारक
- अमोल पाटील
(पूर्वप्रसिद्धी : ‘गीत’ नाताळ अंक २०१७)