संस्कृतीचे साक्षीदार
येथे गडकिल्ले वाडे
गुंजले गर्जले यांत
थोर वीरश्री चौघडे
इतिहासाचा वारसा
समृद्ध करीतो मना
झुंजार थोर ते वीर
झुंजार तयांची सेना
लढाऊ परंपरेच्या
साठविल्या आठवणी
चिरेबंदी दगडाची
चिरेबंदी रे स्मरणी
पाहताच धन्य झालो
मंगल वारसा बाका
शोभते उंच त्यावरी
झुंजार अशी पताका
या पताक्याने जपली
नित्य अस्मितेची शान
थोर संस्कृतीच्या दारी
पताक्याची दिव्य खूण
©अमोल पाटील
(अमोल पाटील लिखित 'मुक्तश्वास' या काव्यसंग्रहातून)
गडकिल्ले संवर्धन करणे गरजेचे आहे. सांस्कृतिक वारसा सांगणारी गडकिल्ले चे जतन करणे काळाची गरज आहे.
ReplyDeleteअतिशय छान कविता..!
ReplyDelete👌👌👌
ReplyDelete